सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी शिबिर; सनराईज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजन

by Team Satara Today | published on : 03 September 2026


सातारा : सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथील सनराईज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने रविवारी (दि. ६ सप्टेंबर) मोफत आरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सेव्हन स्टार सिनेमागृहाशेजारी, बसस्थानकाजवळील सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात होणार आहे.
शिबिरात हृदयविकार, अँजिओग्राफी, पित्ताशय व किडनीतील खडे, प्रोस्टेट, कॅन्सर, गुडघे, खुबा, लिगामेंट, व्हेरिकोज व्हेन्स, थायरॉईड व गर्भाशयातील गाठी तसेच मणक्याच्या आजारांची तपासणी व उपचार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ईसीजी, रक्तातील साखर, रक्तदाब, युरोफ्लोमेट्री व PSA तपासणी मोफत केली जाणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र रेशनकार्डधारकांना विविध शस्त्रक्रिया व उपचार मोफत मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. पुढील उपचारासाठी आवश्यक रुग्णांना मोफत बस सुविधा, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना जेवण व एका नातेवाईकाच्या निवासाची सुविधा उपलब्ध असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पूर्वनोंदणी आवश्यक असून ८०८०७९५०६०, ८९२८७३६९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा. आधारकार्ड, रेशनकार्ड व जुने वैद्यकीय अहवाल सोबत आणावेत, असे आवाहन आयोजक सादिकअली बागवान यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेशोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी घाला; गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन
पुढील बातमी
सदरबझारच्या लक्ष्मी टेकडीवर नक्की कोणाची दहशत? भयभीत नागरिकांचा शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा; परिसरातील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

संबंधित बातम्या