वाठार स्टेशन येथील महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 18 March 2025


पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील उत्तर परिसरातील वाठार स्टेशन येथील श्री वाग्देव विद्यालयात भव्य आरोग्य महामेळावा झाला. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी कार्डिओलॉजिस्ट डॉ. विश्वनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्मिता जाधव, त्वचारोग तज्ज्ञ आण्णासाहेब कदम यांच्या उपस्थितीत आयोजित या आरोग्य महामेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या आरोग्य महामेळाव्यात नागरिकांच्या मोफत प्राथमिक आरोग्य तपासण्या, मोफत सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आले. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांवर विशेष केंद्रित करण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी अचूक माहिती यावेळी मिळाली.

आरोग्य महामेळाव्याचे उद्घाटन वाठार स्टेशनच्या सरपंच सीमा गणेश चव्हाण आणि गणेश चव्हाण, महेश गांधी, अभिजित निकम, स्कूल कमिटी अध्यक्ष विशाल जाधव यासह तज्ज्ञांद्वारे दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी एमक्यूअर फार्माचे हेड मॅनेजर अमोल बारटक्के, मोहम्मद अली मुलाणी, एमजे फार्माचे इरफान शेख, सिप्ला फार्माचे वैभव पवार, अभिजीत शिंदे, युनिडस् हेल्थकेअर फार्माचे सोमनाथ माने, वाठार हेल्थ स्टेशन आणि महाराष्ट्र मल्टिस्पेशालिटी क्लिनिक व्यवस्थापक शीतल पवार यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक आणि रुग्ण उपस्थित होते. महाआरोग्य शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राम मंदिर ट्रस्टने सरकारकडे भरला 400 कोटींचा टॅक्स
पुढील बातमी
बनायला गेले सिंघम पण साताऱ्यातील कार्यकर्त्यांनी केला त्याचा चिंगम ..

संबंधित बातम्या