सातारा : सातारा शहर पोलिस ठाण्यात बेवारस स्थितीत पडून असलेल्या एकुण ३७ दुचाकी वाहनांचा शासन नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येणार आहे. सदर वाहनांबाबत अद्याप पर्यंत कोणीही मालकी हक्क सिध्द केलेला नाही.
ही वाहने उपलब्ध माहितीप्रमाणे कोणाची असल्यास मुळ कागदपत्रांसह सातारा शहर पोलिस ठाणे येथुन ३० सप्टेंबर पुर्वी घेऊन जावीत. त्यानंतर कोणीही या बेवारस वाहनांबाबत हक्क सांगीतल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व नमुद वाहनांचा स्क्रॅप म्हणुन शासन नियमांप्रमाणे लिलाव केला जाईल. तरी संबधीतानी आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत सातारा पोलिस ठाणे, सातार येथे संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी केले आहे.