मणिपूर : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. पुन्हा एकदा मणिपूरमध्ये जाळपोळीच्या घटना घडत आहेत. याच दरम्यान मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर शनिवारी (16 नोव्हेंबर) इम्फाळ खोऱ्यातील विविध भागात आंदोलक हिंसक झाले. त्यानंतर अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच मणिपूरमध्ये इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. जमावाने शनिवारी तीन राज्यमंत्री आणि सहा आमदारांच्या निवासस्थानावरही हल्ला केला होता. पोलिसांनी आतापर्यंत या हिंसाचारात सहभागी 23 जणांना अटक केली आहे. आणखी काही मृतदेह तरंगताना सापडले असून, त्यानंतर तणाव आणखी वाढला आहे.
दक्षिण आसाममधील बराक नदीत पोत्यात भरलेले एक महिला आणि मुलीचे मृतदेह वाहून गेले. शेजारच्या मणिपूर राज्यात सहा मृतदेह सापडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. हिंसाचारग्रस्त जिरीबाममधील विस्थापित लोकांसाठी बांधण्यात आलेल्या मदत शिबिरातून या तीन महिला आणि तितकीच मुले बेपत्ता झाल्याचे समजते. आसाममधील कचारमधील चिरीघाट आणि त्याच जिल्ह्यातील सिंगरबंद III येथून आणखी दोन मृतदेह आढळून आले.
या घटनेसंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंददास कोन्थौजम यांची निंगथौखॉन्ग, भाजप आमदार वाय राधेश्याम यांची लँगमेडोंग मार्केट, थौबल जिल्ह्यातील भाजप आमदार पूनम ब्रोजेन आणि इंफाळ पूर्व जिल्ह्यातील काँग्रेस आमदार लोकेश्वर यांची घरे जाळली. दुर्दैवाने या काळात आमदार व त्यांचे कुटुंबीय घरी उपस्थित नव्हते. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून घरे पूर्णपणे जळून खाक होण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवले. आंदोलकांनी शनिवारी रात्री इंफाळ पूर्व भागातील मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा दलांनी त्यांना 100-200 मीटर अगोदरच रोखले. त्यानंतर जमावाने टायर जाळले आणि बिरेन यांच्या घराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहनांची वाहतूक रोखली.
इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम आणि बिष्णुपूर जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी आणि इंटरनेट बंदी दरम्यान तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी २३ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक, 32 पिस्तूल, सात राउंड दारूगोळा आणि आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. लष्कर आणि आसाम रायफल्सने हिंसाचारग्रस्त भागात ध्वज मार्च काढला, ज्यामध्ये आठ नागरिक जखमी झाले. सीआरपीएफचे डीजी अनिश दयाल सिंग सुरक्षा प्रतिसाद पाहण्यासाठी इंफाळला पोहोचले असल्याची माहिती मिळत आहे.
तसेच मणिपूरमध्ये सप्टेंबर महिन्यातही हिंसाचार झाला होता. आसामच्या सीमेजवळच्या जिरीबात जिल्ह्यात सात सप्टेंबरला हिंसाचार झाला. यात चार संशयित कट्टरपंथी आणि एका सामान्य व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा मणिपूर धगधगतं आहे. अशातच नॅशनल पीपल्स पार्टीने बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढला आहे.
संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |