खंडाळा तालुक्यातील रुई येथील पारधी वस्तीवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईसाठी बेमुदत धरणे आंदोलन

by Team Satara Today | published on : 07 August 2026


सातारा : खंडाळा तालुक्यातील रुई येथील पारधी वस्तीवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईसाठी दलित महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत स्वरूपाचे धरणे आंदोलन सुरू केले असल्याची माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष  उमेश चव्हाण यांनी दिली आहे. 

याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की, आठ दिवसापूर्वी रुई तालुका खंडाळा येथील पारधी वस्तीवर महिला व पुरुषांच्या वर हल्ला करणारे अजूनही मोकाट असून आरोपींवर गुन्हा दाखल केलेला नाही यामध्ये पारधी समाजातील महिलांची व पुरुषांना कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केलेले असताना पोलीस मात्र अजूनही तपास करत आहेत.  जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये पारधी समाजातील महिला व पुरुषांवर उपचार चालू आहेत मात्र अजून गुन्हा दाखल झाल्याने धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे पारधी महिलांच्यावर व पुरुषांच्या वर अजूनही उपचार सुरू असताना येथील डॉक्टर मात्र त्या महिलांची साधी विचारपूस करत नाहीत व उपचार देखील करत नाहीत. सिविल हॉस्पिटल प्रशासन देखील यामध्ये मॅनेज आहे का असा प्रश्न समोर येत आहे.  सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असणारे पोलीस प्रशासन सुद्धा कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता एम एल सी दाखल करून लोणंद पोलिसांना रिपोर्ट दिला का नाही हा ही प्रश्न समोर आला आहे. अजूनही पारधी कुटुंब न्यायाचे प्रतिक्षेत  असून आठ दिवस होऊन गेले तरी लोणंद पोलीस मात्र या प्रकरणांमध्ये टाळाटाळ करत आहेत.  जोपर्यंत आरोपींना गुन्हा दाखल करून अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती उमेश चव्हाण यांनी दिली.  


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सायबर सेलच्या कारवाईने फसवणुकीतील शंभर टक्के रक्कम काही तासांत खात्यात जमा; उंब्रज पोलिसांची कामगिरी

संबंधित बातम्या