सातारा : सैदापूर, ता.सातारा येथील मोळाचा ओढा ते रामनगर जाणार्या रस्त्यावर कारची दुचाकीला धडक बसली. अपघातात दोघे भाउ जखमी झाले आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरुण रमेश फळणे (वय 22, रा.महाबळेश्वर) यांनी मोहन मुकुंद आगाशे (वय 63, रा. महाळुंग ता.माळशिरस जि.सोलापूर) यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 6 जून रोजी घडली आहे. तक्रारदार स्वत: व भाउ विपुल फळणे हे दोघे जखमी झाले आहेत.