सातारा : पोक्सो प्रकरणी स्कूल बस चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फेब्रुवारी ते नोव्हेंबर अखेर सातारा शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी तिच्या स्कूलबसचा चालक किशोर हणमंत नलावडे (रा. वाढे, ता. सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
एका अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी स्कूल बस चालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 13 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा