निरसं दूध पिणे आरोग्यासाठी घातक

by Team Satara Today | published on : 30 October 2024


दूध पिणे अनेकांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. कॅल्शियमचा अत्यंत चांगला स्त्रोत म्हणून दुधाकडे पाहिले जाते. अनेक जण सकाळच्या नाश्त्यामध्ये दूध पिणे पसंत करतात. तर झोप चांगली लागावी म्हणून अनेकजण रात्री झोपण्यापूर्वी दूध पितात.

पण अलीकडे कच्चे किंवा निरसे दूध पिण्याचा ट्रेंड सेट होतो आहे. कच्च्या दुधात अधिक अमीनो ऍसिड, प्रतिजैविक, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॅटी ऍसिड अशी एक मान्यता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी अपायकारक असू शकते. लोकांना वाटते कच्चे दूध तापलेल्या दुधापेक्षा जास्त पौष्टिक आहे. तुम्हालाही असे वाटत असेल तर थांबा. अमेरिकेतील फूड ड्रग अँड ॲडमिनिस्ट्रेशनच्या संशोधनानुसार कच्चे दूध पिण्याशी संबंधित अनेक आरोग्य धोके आहेत. कच्च्या दुधात अनेक जिवाणू असतात. ज्याने पोटासंबंधित अनेक त्रास होण्याची शक्यता वाढते.

ई कोलाय : या विषाणूमुळे enteritis, युरिनरी इन्फेक्शन याचा त्रास होऊ शकतो.

कोलिफॉर्म बॅक्टेरिया : अस्वच्छ उत्पादन प्रक्रियेमुळे या बॅक्टेरियाची निर्मिती होते.

साल्मोनेला : या बॅक्टेरियामुळे फूड पॉयजननिंग होण्याची शक्यता वाढते.

लिस्टेरिया : लिस्टेरिओसिस संक्रमणास कारणीभूत ठरते ज्यामुळे ताप, उलट्या, अतिसार, आळस आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी लक्षणे निर्माण होऊ शकतात.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'सिंघम अगेन' सोबत झळकणार "संगीत मानापमान"चा टिझर
पुढील बातमी
दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी भारताने थेट रणगाडेच उतरवले

संबंधित बातम्या