03:36pm | Oct 11, 2024 |
इंग्लंड क्रिकेट टीमने पाकिस्तान दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. उभयसंघातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा मुलतानमध्ये खेळवण्यात आला. इंग्लंडने हा सामना पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रात जिंकला. इंग्लंडने पाकिस्तानचा 1 डाव आणि 47 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानसाठी हा त्यांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला आहे. तसेच 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तान अशा पद्धतीने सामना गमावणारी पहिलीच टीम ठरली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशा अपमानास्पद पद्धतीने कोणत्याच संघाचा पराभव झाला नव्हता.
पाकिस्तानचा अपमानास्पद पराभव
पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या. पाकिस्तानने अप्रतिम सुरुवात केली होती. त्यामुळे सामना ड्रॉच होणार अशीच चिन्हं होती. मात्र साम्न्यातील चौथ्या दिवशी सर्व समीकरणं बदलली. शेवटच्या सत्रात गेम असा बदलला की पाकिस्तानला डाव आणि 47 धावांनी पराभूत व्हावं लागलं. पाकिस्तान कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात 500 पेक्षा अधिक धावा करुनही पराभूत होणारी पहिलीच टीम ठरली आहे.
इंग्लंडची ऐतिहासिक कामगिरी
इंग्लंडने पाकिस्तानच्या 556 च्या प्रत्युत्तरात पहिला डाव हा 823 धावांवर जाहीर केला. इंग्लंडने अशाप्रकारे 267 धावांची आघाडी घेतली. मात्र पाकिस्तानला दुसऱ्या डावात 220 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि इंग्लंडने विजय मिळवला. पाकिस्तानने पाचव्या दिवसाची सुरुवात 4 बाद 152 पासून सुरुवात केली. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रातच पाकिस्तानला 6 झटके देत गुंडाळलं.
ब्रूक-रुट चमकले दरम्यान हॅरी ब्रूक आणि जो रुट ही जोडी इंग्लंडच्या विजयाची शिल्पकार ठरली. रुटने 262 धावा केल्या. तर हॅरी ब्रूकने 317 धावांची खेळी केली. हॅरी इंग्लंडकडून 34 वर्षांनी आणि वेगवान त्रिशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. या दोघांनी इंग्लंडसाठी कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च धावांची भागीदारी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 454 धावा जोडल्या. तर जॅक लीच याने दोन्ही डावात मिळून एकूण 7 विकेट्स घेतल्या.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |