सातारा : सातारा येथील भीमाबाई आंबेडकर समता प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने जरंडेश्वर नाका परिसरातील भिमाबाई आंबेडकर यांच्या स्मारकाच्या आवारात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
राष्ट्रध्वजारोहण सेवानिवृत्त विभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भिमाबाई आंबेडकर समता प्रतिष्ठान साताराचे अध्यक्ष सुदाम आवडे , सेक्रेटरी वामनराव गंगावणे , तसेच विजयकुमार कांबळे , निलेश भोसले , रणदिवे उपस्थित होते.