येत्या निवडणुकांत काँग्रेसचे अस्तित्व पूर्व पदावर आणण्यासाठी निर्णय घेतले जातील : पक्ष निरीक्षक पृथ्वीराज साठे यांचा साताऱ्यात विश्वास

by Team Satara Today | published on : 02 November 2025


सातारा : सातारा जिल्ह्याने स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसला विचार व शक्ती देण्याचे कार्य केले आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने या जिल्ह्यातील काँग्रेस ही विचारांवर निष्ठा ठेवणारी व देशातील पुरोगामी ही विचारांना शक्ती देणारी राहिली आहे. या जिल्ह्यातील सामान्य जनता व शेतकरी या विचारधारेवर कायम राहतील याचा आम्हाला विश्वास आहे. म्हणूनच या जिल्ह्यातील आजचे काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसला उभारी देतील व येत्या निवडणुकांत काँग्रेसचे अस्तित्व पूर्व पदावर आणण्यासाठी निर्णय घेतले जातील असे स्पष्ट उदगार सातारा जिल्ह्याचे प्रभारी पृथ्वीराज साठे यांनी काढले. 

आज कॉंग्रेस भवन, सातारा येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा प्रभारी पृथ्वीराज साठे  , विधानसभांचे निरीक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. अध्यक्ष स्थानी जिल्हा काँगसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख होते. यावेळी स्व. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या सर्व गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी सातारा जिल्हा महिला काँग्रेसने केलेल्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे उपस्थित होत्या.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी यांच्याशी तालुका निहाय चर्चा करून जिल्हाप्रभारी पृथ्वीराज साठे यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, जिल्हा प्रभारी पृथ्वीराज साठे जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार विधानसभांचे सर्व निरीक्षक, जाकीर पठाण, भानुदास माळी, बाबासाहेब कदम, अमरजीत कांबळे, धैर्यशील सुपले, प्रा. सदाशिव खाडे, ऍड. श्रीकांत चव्हाण, रजनीताई पवार संजय तडाके, अजित कदम आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा महिला काँग्रेसने केलेल्या साखळी उपोषणास भेट दिली.

यावेळी कोरेगाव विधानसभा निरीक्षक उमेश खंदारे, वाई विधानसभा निरीक्षक यासीन शेख, माण विधानसभा निरीक्षक नंदकुमार शेळके, कराड उत्तर व दक्षिणचे निरीक्षक संजय बालगुडे, पाटण विधानसभा निरीक्षक सचिन आडेकर, सातारा तालुका निरीक्षक श्रीमती शौनी नौशाद , जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा राजे घोरपडे, इंद्रजीत चव्हाण, आनंदराव जाधव, गजानन नावडकर, डॉक्टर संतोष कदम, निवास थोरात, नामदेवराव पाटील, ऍड. अमित जाधव, बाबासाहेब माने, जयदीप शिंदे, प्रतापराव देशमुख, विलासराव पिसाळ, अशोकराव पाटील अजितराव पाटील चिखलीकर, अमर करंजे, मनोजकुमार तपासे, मालन परळकर, प्राची ताकतोंडे, मंजिरी पानसे, धनश्री मालुसरे, अनिता जाधव, अरुणा नाझरे, सज्जन यादव, शंकरराव पवार, महेश साळुंखे, सुरेश कुंभार, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. धैर्यशील सूपले यांनीआभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहुनगर येथे अज्ञात चोरटयांनी केली ५९ हजाराची घरफोडी
पुढील बातमी
रूपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेस महिला आघाडीच्या संध्या सव्वालाखे यांची मागणी, महिला कॉंग्रेसच्या उपोषणास पाठींबा

संबंधित बातम्या