खंडाळा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बेंगरुटवाडी ता. खंडाळा गावच्या हद्दीत अंदाजे 28 ते 30 वयाच्या एका विवाहित युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित युवतीचा घात की अपघात याबाबत चर्चेला उधाण आले असून अन्य ठिकाणी घातपात करीत सेफ झोन मानल्या गेलेल्या डंपिंग ग्राऊंड अर्थात खंबाटकी घाटामध्ये मृतदेह टाकून देण्यात आल्याची शक्यता खंडाळा पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे.
बेंगरुटवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीत खंबाटकी घाटातील एक वळणालगत एक मालट्रक बंद पडल्याने संबंधित मालट्रकवरील चालक हे मालट्रक दुरुस्त करीत असताना व त्याठिकाणी दुरुस्तीकरीता यंञज्ञ येण्यासाठी उशिर लागणार असल्याने चालक कठड्याच्या बाजूला उग्र वास आल्याने चालकाचे खंबाटकी घाटातील दरीत लक्ष गेल्याने त्याठिकाणी एक महिलेचा मृतदेह दिसून आला असता तत्काळ खंडाळा पोलीसांशी संपर्क साधला.यावेळी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके,सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के व खंडाळा पोलीस,शिरवळ रेस्क्यू टिमच्या सहकार्याने मृतदेह दरीतून काढत खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक डाँ.वैशाली कडूकर, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने भेट देत पाहणी केली, यावेळी संबंधित विवाहित युवतीच्या डोक्यात लोखंडी हत्याराने पाच ते सहा वार केले असल्याचे स्पष्ट झाले असून वार वर्मी बसल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत खंडाळा पोलीस स्टेशनला सुरु होते.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल शेळके हे करीत आहे.
मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
फोन उचलत नसल्याच्या कारणातून एकास मारहाण |
कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास |

दगडाने मारहाण प्रकरणी एकाविरोधात गुन्हा |
अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा |
मंगळवार पेठेतून दुचाकीची चोरी |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
शाहूनगरमधील घरफोडीची उकल |