सातारा : युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ स्थापन केलेल्या वा.ग.तथा अण्णासाहेब चिरमुलेचॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात अमूल्य सेवा देणाऱ्याव्यक्तींचा सन्मान केला जातो. सन्मानचिन्ह व रु.एक लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या वर्षी ट्रस्टने माननीय पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांना त्यांच्या सार्वजनिक आरोग्य व संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन २०२३ चा ‘चिरमुले पुरस्कार’ देऊन गौरविण्याचे ठरविले आहे. डॉ.हिम्मतराव बावस्कर हे विख्यात वैद्यकीय संशोधक आहेत. ते विंचू विषबाधेच्या उपचारांवरील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत.
कोकणात महाड येथे काम करत असताना त्या ठिकाणी नेहमीच विंचू दंश झाल्याच्या घटना घडत व दुर्गम भागात त्यावर उपचार मिळणे कठीण असे. त्यामुळे त्यांनी विंचू दंशाच्या घटनांवर संशोधन करून प्रभावी उपचार पद्धती विकसित केली ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. विंचवाच्या विषामुळे प्रामुख्याने माणसाच्या हृदय व फुफ्फुसावर परिणाम होत असल्याचे त्यांनी शोधले व प्रॅझोसिन या औषधाचा वापर करून विंचवाच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यू दरात मोठी घट केली. त्यांच्या या संशोधनामुळे ग्रामीण भागात अनेकांचे प्राण वाचले. तसेच त्यांनी या औषधाच्या वापराबाबत सर्वांना माहिती करून दिली. जगभरात अनेक ठिकाणी त्यांची सदर उपचार पद्धती मान्य व प्रचलित झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूंवरदेखील लक्ष केंद्रित करून, सरकारने सर्पदंशाने होणारे मृत्यू HIV आणि TB प्रमाणे नोटिफिकेशन करण्यायोग्य बनवावेत आणि सर्पदंशविरोधी विष (ASV) चा योग्य डोस व त्याच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करून ते सर्व डॉक्टरांपर्यंत पोहोचवावे यासंबंधी ते आग्रही आहेत. डॉ. बावस्कर यांच्या कार्यामुळे विंचू दंशविषयी जागरूकता वाढली आहे. त्यांचे कार्य हे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन व सामाजिक सेवा यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. डॉ.हिम्मतराव बावस्कर यांचे ग्रामीण आरोग्य व संशोधन क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी असून, त्यांचे कार्य सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात महत्वपूर्ण ठरले आहे. चिरमुले ट्रस्टने यापूर्वी डॉ.कै.मनमोहन सिंग, डॉ.श्री.विजय भटकर, डॉ.अनिल काकोडकर, कै.रतन टाटा, कै.राहुल बजाज, डॉ.सी.रंगराजन, श्री.गुलजार, डॉ.सायरस पूनावाला,डॉ.राजेंद्रसिंह, आदि आदरणीय व्यक्तिना या पुरस्काराने गौरविले आहे. डॉ. बावस्कर यांना पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम सातारा येथे बुधवार दि.१५.०१.२०२५ रोजी संध्याकाळी ५ वा. धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या कै. लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलसभागृहात, जेष्ठ डॉ. शरद अभ्यंकर यांच्या शुभहस्ते व मा. डॉ.श्री.ज्ञानदेव म्हस्के - व्हाईस चान्सेलर, कर्मवीर भाऊराव पाटील
यूनिवर्सिटी, सातारा यांचे अध्यक्षतेखाली व श्री विकास देशमुख-सचिव रयत शिक्षण संस्था, सातारा यांचे उपस्थितीत आयोजित केला आहे. अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त - श्री.दिलीप पाठक,डॉ.अनिल पाटील, डॉ.अच्युत गोडबोले, समीर जोशी वपुरस्कार समितीचे संयोजक अरुण गोडबोले यांनी दिली आहे.तरी सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे.
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |