सातारा : सोमवारी दुपारी एकतर्फी प्रेमातून मुलीच्या गळ्याला चाकू लावून थरार उडवून देणार्या प्रेमवीरावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आर्यन चंद्रकांत वाघमळे (वय 18, रा.मोळाचा ओढा, सातारा) असे त्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आर्यन याने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून ‘तू मला भेटत का नाही. माझ्याकडील तुझे फोटो व्हायरल करेन. आपण पळून जावू. तु आली नाही तर तुझा खून करेन,’ असे म्हणत धमकी देत मारहाण केली. या घटनेनंतर परिसरातील जमलेल्या नागरिकांनी व शहर पोलिसांनी मुलीची सुटका केली. त्यानंतर संतप्त जमावाने आर्यन याची धुलाई केली. तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास महिला सहा. पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.