03:11pm | Aug 21, 2024 |
खूप वेळ पाय दुमडून बसलास किंवा एकाच स्थितीत खूप वेळ उभे राहिल्यावर पाय सुन्न होतात किंवा हाता पायाला मुंग्या येतात. एकाच जागी खूप वेळ थांबलं किंवा झोपलो की हा त्रास होतो. याचं कारण झोपताना किंवा उभे राहताना, बसताना शरीराच्या अवयवांवर सर्वाधिक ताण पडतो. अनेकदा एकाच स्थितीत पाय दुमडून बसल्याने शिरांवर दाब पडून रक्त प्रवाह थोडा हळू होतो. त्यामुळे अवयव सुन्न पडतात. हाता पायाला मुंग्या येणं ही अतिशय सामान्य गोष्ट असली तरी हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्या त्रासाचं लक्षण आहे का हे तपासणे गरजेचे आहे.
या कारणांमुळे हाता पायाला येतात मुंग्या :
एकाच स्थितीत अधिक वेळ बसून राहिल्यामुळे हा त्रास अनेकांना होतो. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे किंवा एकाच जागेवर खूप वेळ बसल्यामुळे हातापायाला किंवा खांद्याला मुंग्या येऊ लागतात.
जर हाता पायांना वारंवार मुंग्या येत असतील तर तुमच्या शरीरात विटामिन बी ट्वेल्थ ची कमतरता असू शकते त्यामुळे सतत थकलेला किंवा आळसवणे वाटू लागते.
रक्तातील साखरेचा प्रमाण वाढलं की हातापायांना मुंग्या येण्याची समस्या वाढू शकते. तसेच मानेची नस आखडले गेल्यास पाठीपासून पायापर्यंत मुंग्या येऊन तो भाग दुखू लागतो. चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे अनेकदा असा त्रास होऊ शकतो.
एका पद्धतीने खूप वेळ बसल्यामुळे त्या अवयवाला होणारा रक्तपुरवठा काहीसा विस्कळीत होतो. त्यामुळे खूप वेळ बसल्यानंतर अचानक उठलो की पाय सुन्न पडतात व काही वेळाने पायाला मुंग्या येऊ लागतात. पण अशावेळी करायचं काय?
हाता पायाला मुंग्या आल्या तर काय करावे? अनेकदा एका जागेवरून उठलो की पाय सुन्न पडून पायाला खूप मुंग्या येतात. पायाला मुंग्या आल्या की चालताना तोल जातो. त्यासाठी बसल्या जागी काही उपाय करता येतील.
पायाला मुंग्या आल्या आहेत असे समजल्यानंतर ज्या पायाला मुंग्या आल्या आहेत तो पाय थोडासा हलवावा. असे केल्याने प्रथमतः अधिकच मुंग्या आल्या आहेत असं जाणवेल पण पायातील शिरांवर आलेल्या ताण हलका करण्यासाठी हे गरजेचं आहे.
जिथे मुंग्या आल्या आहेत तिथे लक्ष केंद्रित करून एक दोन वेळा मान गोलाकार दिशेने फिरवा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो असे तज्ञ सांगतात. हाता पायाला मुंग्या आल्यास थोडसं खोबरेल तेल लावून त्या जागेवर हलका मसाज करावा.
अनेकदा ऑफिसमध्ये असताना किंवा कामात असताना हातापायाला मुंग्या येऊ शकतात. अशावेळी त्या भागाला हाताने हलके चोळल्यास रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहणं गरजेचं असून यामुळे शरीर हायड्रेट राहून हातापायाला आलेल्या मुंग्या काही वेळाने दूर होतात.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |