शिरवळ : सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खंडाळा तालुका शेतकरी सहकारी कारखान्याच्या निवडणूकीमध्ये अभूतपूर्व नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने ऐनवेळी १४ उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडून बिनविरोध झाली. सर्वच २१ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रथापित केले आहे.
कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये जागावाटपात एकमत न झाल्याने भाजपकडून १४ उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ संचालकांचा मार्ग सुकर झाला. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. प्रगती बागल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रिती काळे, अनिल क्षिरसागर यांनी काम पाहिले.
निवड झालेल्या संचालकांची नावे -
खंडाळा ऊस उत्पादक गट - चंद्रकांत मारुतराव ढमाळ, शिवाजी सदाशिव खंडागळे, दत्तात्रय नारायण ढमाळ,
शिरवळ ऊस उत्पादक गट - राजेंद्र उर्फ अनंत पांडुरंग तांबे, रामदास महादेव तळेकर, प्रवीण सदाशिव जाधव,
बावडा ऊस उत्पादक गट - विश्वनाथ गोविंद पवार, रमेश नारायण धायगुडे, मनोज फुलचंद यादव
भादे ऊस उत्पादक गट - मयूर शिवाजी जगताप, ज्ञानेश्वर मुकुटराव भोसले, राजेंद्र रामचंद्र कदम
लोणंद ऊस उत्पादक गट - धनाजी गुलाबराव अहिरेकर, शिवाजीराव शंकरराव शेळके-पाटील, नानासो बाळकृष्ण ननावरे
ब वर्ग प्रतिनिधी - डॉ. अनिलराजे अनंतराव निंबाळकर
अनुसूचित जाती व जमाती - काँग्रेसचे रत्नाकांत आनंदराव भोसले
महिला राखीव - शामल धनंजय नेवसे, रंजना भाऊसो धायगुडे
इतर मागासवर्ग - नितीन काशिनाथ ओव्हाळ
भटक्या विमुक्त जाती व जमाती - बाळासाहेब पांडुरंग शेळके
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच एका गटाकडून निवडणूक लागण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र जागावाटपात एकमत न झाल्याने भाजपकडून सर्वच उमेदवारांचा अर्ज माघारी घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर गोंधळ निर्माण झाला.
तज्ञ संचालकपदी कोणाची वर्णी ?
बिनविरोध निवडणूकीनंतर तज्ञ संचालकपदी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. चर्चेला उधाण आले आहे. प्राथमिक माहितीनुसार तज्ञ संचालकपदी मंत्री मकरंद पाटील, लेखापरीक्षक प्रवीण गाढवे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
भाजपच्या ऐनवेळी माघारीमुळे खंडाळा साखर कारखाना निवडणुकीत सर्वच २१ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
by Team Satara Today | published on : 13 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा