कण्हेर : माझ्या प्रत्येक वाटचालीत तुमचा पाठिंबा असून कामातही आपण वारंवार हातभार लावत आहात. त्याच ताकतीने भाजपा सदस्य महाअभियानात हातभार लावणे गरजेचे आहे. आपण सभासद नोंदणीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात नंबर वन आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सदस्यता महा अभियान सभासद नोंदणीमध्ये आपल्या जिल्ह्याचा राज्यात नावलौकिक करू, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
कोंडवे, ता. सातारा येथे भाजपा सदस्यता महाअभियनाचा शुभारंभ ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सुमारे 250 सभासदांची नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमास माजी सभापती धर्मराज घोरपडे, सौ. सरिता इंदलकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश गाडे, शहराध्यक्ष विकास गोसावी, सरचिटणीस वैभव यादव, सरपंच मोहित चोरगे यांची उपस्थिती होती.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ताकतीचे व काम करणारे मुख्यमंत्री राज्याला लाभले आहेत. जिल्ह्याला भाजपाने चार मंत्री देऊन ताकद वाढवलेली आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून दिलेले काम परिपर्ण करून त्या संधीचे सोने करणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी भाजपा सदस्यता महाअभियनामध्ये ताकतीने काम करून सभासद नोंदणीची कामे करावयाची आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यांनी सुमारे 150 सभासद नोंदणी करून यामध्ये एक लाखाचा टप्पा पूर्ण करायचा आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष महेश गाडे यांनी सभासद नोंदणीविषयी माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर निंबाळकर, माजी सरपंच किरण गाडे, उपसरपंच अर्चना भुजबळ, दीपाली गाडे, मंदा गाडे, दिलीप निंबाळकर, फारुख खान, अनिल वीर, लालासो भुजबळ, मानाजी निंबाळकर, सुरेश टिळेकर, रमेश चव्हाण, अरुण पवार, गौरव इंगवले, मनोज घाडगे, मच्छिंद्र गोगावले, अर्जुन घाडगे, नवनाथ ननावरे, आयुब मोकाशी, महेश अहिरे, अनिकेत चव्हाण, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संभाजी इंदलकर यांनी केले. दीपक भुजबळ यांनी आभार मानले.