सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माहुली तालुका सातारा येथील एका विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन जाचहाट केल्याप्रकरणी पती साहिल पोपट धस, सासू, सासरे पोपट दिनकर धस, जाऊ, दीर अक्षक पोपट धस (सर्व रा. खावली, ता. सातारा) आणि नणंदेविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.