सातारा : काशीळ एसटी स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी चेहरा झाकून फिरणार्या एका तरुणाविरुद्ध बोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 10 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास संबंधित युवक अंधारात संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आला. स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्याने चेहर्यावर रुमाल बांधल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी कृष्णा रंगा पवार (वय 24, रा. खेड, सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस हवालदार कचरे करीत आहेत.