सातारा : हिवरे, ता. कोरेगाव येथील माजी सैनिक हणमंत सखाराम खताळ (वय 68) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांनी भारतीय सैन्य दलात लडाख, सियाचीन, लखनौ, पुणे येथे कर्तव्य बजावले आहे.
सैन्यदलात सेवा बजावल्यामुळे ते शिस्तीचे पाईक होते. त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देवून सुसंस्कारी घडवले. त्यांच्या अचानक जाण्याने हिवरे परिसरावर शोककळा पसरली. अंत्यसंस्काराला विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते. दैनिक ‘पुढारी’च्या सातारा कार्यालयातील उपसंपादक आदेश खताळ यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, नातवंडे, जावई असा परिवार आहे.