फलटण तालुक्यात एकाचा निर्घृण खून

फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 12 June 2025


सातारा : फलटण तालुक्यात एकाचा अज्ञाताने निर्घृण खून केल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी फलटण पोलिसांना फलटण तालुक्यातील ठाकूरकी येथील पंधरकी नावाच्या शिवारात एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मिळून आला होता.

याच दरम्यान सोनाली संदीप रिटे रा. ठाकूरकी, ता. फलटण, जि. सातारा या महिला त्यांचे पती संदीप मनोहर शिंदे हे हरवल्याबाबतची तक्रार देण्यास फलटण शहर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना संबंधित बेवारस मृतदेह दाखवला असता त्यांनी तो मृतदेह त्यांचे पती संदीप रिटे यांचाच असल्याचे ओळखले. संदीप रिटे यांच्या शरीरावर खोलवर जखमा होऊन रक्तस्त्राव झाल्याचे दिसून येत असून कोणीतरी अज्ञात इसमाने रिटे यांचा निर्घृणपणे खून केल्याचे समोर आले आहे. याबाबत अज्ञाता विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बच्चू कडूंच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दिव्यांगांनी रोखला अशियाई महामार्ग
पुढील बातमी
दौलतगनर येथे तब्बल 5 लाखांची घरफोडी

संबंधित बातम्या