सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावर चारचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. याप्रकरणी अज्ञात चारचाकी चालकाच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी उमेशचंद्र दत्ताजीराव साळुंखे (रा. नागठाणे, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दि. १३ एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास सातारा-कोरेगाव रस्त्यावर अपघात झाला. अज्ञात चारचाकीची दुचाकीला धडक बसली. यामध्ये तक्रारदार आणि त्यांची पत्नी जखमी झाले. तसेच या अपघातानंतर संबंधित चालक मदत न करता निघून गेला. त्यामुळे पोलिसांत तक्रार देण्यात आली.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा