सातारा : सण व उत्सवांच्या दिवसांसाठी शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक/ध्वनीवर्धक वापरण्यास विजयादशमी / दसऱ्या दिवशी दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्या पासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार नवरात्र उत्सव विजयादशमी/दसरा दि. 2 ऑक्टोबर 2025 या एका दिवसासाठी सुट देण्यात आली आहे. ध्वनी मर्यादेशी संबंधित सर्व तरतुदींचे पालन करणे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे व उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणा संबंधात दिलेल्या आदेशातील बाबींचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी संबंधित ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची असेल असेही त्यांनी या देशांमध्ये स्पष्ट केले आहे.