सातारा : विलासपूर येथे अज्ञात चोरट्यांनी चेन स्नॅचिंग केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विलासपूर सातारा येथे तेथीलच डॉ. सौ. अश्विनी कैलास विभुते या त्यांची जाऊ ज्योती यांच्याबरोबर हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून घरी जात असताना दोन अज्ञातांनी मोटरसायकल वरून येऊन त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.