सातारा : सातारा शहराजवळ बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात बुधवारी रात्री कारने पेट घेतल्याने अवघ्या काही क्षणात ती जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद झालेली नव्हती.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, कार सर्व्हिस रोडने कराडच्या दिशेने निघाली होती. कारमधून धूर येवू लागल्यानंतर परिसरात गर्दी झाली. तोपर्यंत पाहता पाहता कारला आग लागून आगीने रौद्ररुप धारण केले. कारला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न झाला. मात्र आग आटोक्यात आली नाही व ती जळून खाक झाली.