सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रथमेश राकेश अमरापूरकर (रा. आप्पा पाटील नगर, ता. कोरेगाव, जि. सातारा) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने, निष्काळजीपणे चालवल्याने दुचाकी रस्त्यावर घसरुन अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीच्या मागील सीटवर बसलेले जयवंत भानुदास आवळे (रा. आरफळ, ता. सातारा) हे जखमी झाले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर करीत आहेत.