सातारा : एका युवतीचा विनयभंग करुन तिला धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात सातार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, युवतीला अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आशिष शिंगाडे (रा.शेणोली ता.कराड) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 9 जून ते 2 जुलै या दरम्यान घडली आहे. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू जर माझ्यासोबत बोलली नाही तर जिवंत सोडणार नाही,’ असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेटकरी करीत आहेत.