नवी मुंबई विमानतळावर लागणार यूजर शुल्क

प्रवाशांना भरावे लागेल 1,225 रुपये

by Team Satara Today | published on : 26 June 2025


नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. त्याच्या उद्घाटनाची अंतिम तारीख अद्याप निश्चित झाली नाही. परंतु विमानतळाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना किती 'यूजर डेव्हलपमेंट फीस' (UDF) भरावी लागेल हे आधीच स्पष्ट झाले आहे. निर्माणाधीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1,225 रुपयांपर्यंत यूजर डेव्हलपमेंट फीस (UDF) आकारण्यास विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

यूजर डेव्हलपमेंट फीस (UDF) हे एक प्रकारचा शुल्क आणि ते प्रवाशांना विमानतळाचा वापर करण्यासाठी द्यावे लागते. हे शुल्क सध्या आर्थिक वर्ष 2025-26 साठी निश्चित करण्यात आले आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर नियमित शुल्क धोरण (Regular tariff policy) तयार केले जाईल आणि त्यानंतर या या शुल्कात बदल होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी 1,225 रुपये शुल्क :

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडद्वारे या विमानतळाचा विकास केला जात आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे विमानतळ प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देशांतर्गत उड्डाणांसाठी 620 रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी 1,225 रुपये यूजर डेव्हलपमेंट फीस म्हणून द्यावे लागणार आहे.

यूजर डेव्हलपमेंट फीसला तात्पुरती मंजुरी :

आर्थिक वर्ष 2025-26 साठी तात्पुरत्या स्वरुपात या यूजर डेव्हलपमेंट फीसला मंजुरी देण्यात आली आहे. 31 मार्च 2026 पर्यंत किंवा नियमित शुल्काच्या अंतिम निश्चितीपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात यूडीएफ आकारण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे एअरपोर्ट्स इकोनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटीने स्पष्ट केले. त्यामुळे नवीन धोरण तयार होईपर्यंत किंवा 31 मार्च 2026 पर्यंत नवी मुंबई विमानतळावर हेच शुल्क लागू असणार आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कौटुंबिक वादातून सावत्र भावाला भोसकले
पुढील बातमी
शाहू महाराजांचे विचार एकविसाव्या शतकातही उपयुक्त : अ‍ॅड. राजेंद्र गलांडे

संबंधित बातम्या