सातारा : मांडवे, ता. सातारा येथे घरासमोर जेसीबी उभा करुन थांबले असता जेसीबी उभा केल्याच्या कारणावरुन चौघांनी एकाला मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात दगड मारला.
ही घटना दि. २३ रोजी घडली. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात जेसीबी ऑपरेटर हरिष जयंत पवार (वय २५, रा. मांडवे, ता. सातारा) याने फिर्याद दिली असून, सागर रायसिंग गायकवाड, योगेश मालसिंग गायकवाड, महेश मालसिंग गायकवाड, मालसिंग शामराव गायकवाड (सर्व रा. मांडवे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस शिंदे तपास करत आहेत.