कोरेगावमध्ये शॉर्टसर्किटमुळे दोन दुकानांना आग

साडे तीन लाखांचे नुकसान

by Team Satara Today | published on : 29 March 2025


कोरेगाव : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर मार्केट यार्ड परिसरात गुरुवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे दोन दुकानांना आग लागली. यामध्ये दोन्ही दुकानातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या आगीत साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

योगेश पडवळ यांचे रेडियम नंबर प्लेटचे तर त्याच्या शेजारी जमीर कडकडी यांचे बॅटरीचे दुकान आहे. मध्यरात्री दोन वीज वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाले. याच्या ठिणग्या वैष्णवी आटर्स या दुकानात पडल्या. त्यानंतर काही वेळातच आग लागली. या आगीची धग शेजारच्या दुकानाला लागली. यामध्ये दोन्ही दुकाने खाक झाली आहेत. आग लागल्याचे समजताच माजी नगरसेवक नितीन ओसवाल यांच्यासह नागरिक, व्यापार्‍यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच याची माहिती रहिमतपूर पालिकेच्या अग्निशामक दलाला दिली.  अग्निशामक दल दाखल झाल्यानंतर काही तासाने ही आग आटोक्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरटकर प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयावर आरोप
पुढील बातमी
पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात हिंसाचार

संबंधित बातम्या