सातारा : कळंभे, ता. वाई येथे सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार मकरंद पाटील तसेच खासदार नितीनकाका पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, कळंभे गावचे सुपुत्र तथा बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य कार्याध्यक्ष तुषार मोतलिंग, सरपंच नीलम शिवथरे, उपसरपंच आबाजी सुतार, माजी सरपंच ज्योती गायकवाड, सारिका गायकवाड, माजी उपसरपंच प्रकाश बाबर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार मकरंद आबा पाटील म्हणाले, किसनवीर कारखान्यावर प्रस्थापितांनी कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला होता. मात्र यानंतर कारखाना सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवत आमच्याकडे सूत्रे सोपवल्यावर आम्ही हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत. वाई परिसरातील विकास कामांसाठी मी आणि खासदार नितीनकाका पाटील कटिबद्ध असून या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हवा तेवढा विकास निधी उभारण्यात येईल. यावेळी पाटील यांनी प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश देवुन लगेच कामे सुरू करण्यास सांगितले आहे.
यावेळी कळंभे ग्रामस्थांच्या वतीने खासदार नितीनकाका पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
जननायक आ.मकरंद आबा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतुन नविन व जुने गावठाण हद्दीतील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे. रु.पंधरा लाख, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कळंभेचे आवारात डोंगरी विकास योजनेतुन नविन आर.सी.सी.व पत्र्याची अंगणवाडी बांधणे. रक्कम रु.बारा लाख, सिध्दार्थनगर/मागासवर्गीय वस्ती कळंभे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर योजनेतुन सामाजिक सभागृह/अभ्यासिका, वाचनालय बांधणे. रक्कम रु.पंचवीस लाख, दळे जोत्सकी कळंभे येथिल श्री.रमेश वाघमारे गुरुजी यांचे शेताशेजारी ओढ्यावर जलयुक्त शिवार योजनेतुन पाणी साठवण बंधारा बांधणे. रक्कम रु.पंधरा लाख, ग्रामपंचायत कळंभे चा वित्त आयोगातुन नविन पाणीपुरवठा पाईपलाईन व दुरुस्ती करणे. रक्कम रु.चार लाख पन्नास हजार, ग्रामपंचायत कळंभेचा 15 वा वित्त आयोगातुन जि.प.शाळेचे मुलींसाठी एक युनिटचे शौचालय बांधणे,नविन गावठाण अंगणवाडी येथे तार कंपाऊंड बांधणे, जुने गावठाण येथे गटर बांधणे, ग्रा.प.समोर कॉंक्रीट करणे इत्यादी उर्वरीत लहान कामे करणे. रक्कम रु.तीन लाख, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय पाठीमागे नविन शौचालय व मुतारी युनिट बांधणे. रक्कम रु. तीन लाख, समाजकल्याण योजनेअंतर्गत मातंग वस्ती येथे डांबरीकरण करणे(लोकार्पण) रुपये-दहा लाख, वित्त आयोगातुन जुने व नविन गावठाण मध्ये मुख्य नाक्यावर/चौकात पाच-सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. रक्कम रु.पन्नास हजार, याशिवाय नविन वर्षात आणखी 15 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा कळंभे येथे पार पडला.
कार्यक्रमाचे नियोजन कळंभे गावचे युवा नेते विक्रम शिवतरे यांनी उत्तम प्रकारे केले. यावेळी कळंभे ग्रामस्थांसह परिसरातील बहुसंख्य महिला-भगिनी, नागरिक उपस्थित होते.
कळंभे येथे सुमारे एक कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न
आमदार मकरंद पाटील यांच्यासह खासदार नितीनकाका पाटील यांची उपस्थिती
by Team Satara Today | published on : 28 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा