फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल.

by Team Satara Today | published on : 02 April 2026


सातारा  : सातारा शहर परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका युवकावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मी टेकडी परिसरात राहणाऱ्या संशयित आरोपी अक्षय कडाळे याने अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा उजवा हात धरून माझ्यावर प्रेम आहे का नाही ते सांग.असे म्हणून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, यावेळी मुलीच्या आत्याने आमच्या मुलीला का त्रास देतो अशी विचारणा केली असता अक्षय याने आत्या व तिच्या दोन्ही मुलांना आणि चुलत्याला हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. तसेच पीडितेला माझ्याबरोबर राहिली नाहीस तर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन व माझ्याकडे असलेले तुझे फोटो वायरल करीन अशी धमकी दिली. याप्रकरणी १६ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाटखळ माथा येथे बंद असलेल्या पोल्ट्रीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा
पुढील बातमी
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी