राम नवरात्रात संध्याकाळी घुमत आहेत रामरक्षाचे स्वर; सातारच्या श्रीराम ध्यान मंदिरात रामभक्तांसाठी अनोखी पर्वणी

by Team Satara Today | published on : 24 March 2026


सातारा : येथील शाहूपुरी परिसरातील गेंडामाळ  येथील पाटील परिवाराच्या श्रीराम ध्यान मंदिर अर्थात शांत राम मंदिरामध्ये सध्या राम नवरात्राचा उत्साह ओसंडून वाहत आहे. या मंदिराला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, स्वागतासाठी उभारलेली स्वागत कमान तसेच मंदिर परिसरात घातलेल्या रंगीत पायघड्या, मंदिरातील गाभाऱ्या केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि तितक्याच अतिशय कोमल व मधुर भाव असलेल्या प्रभू श्रीरामचंद्र, श्रीलक्ष्मण आणि सीतामाईच्या संगमरवराच्या दगडात घडविलेल्या आणि कलाकाराने अतिशय जीव व प्राण ओतून बनविलेल्या सुबक, सुंदर, देखण्या मूर्ती व त्यांना घातलेली सुंदर रेशमी वस्त्रे आणि त्यांचे दर्शन घेताना रामभक्तांचे अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटत आहे. 

अतिशय शांत ,रमणीय, निसर्गरम्य वातावरणातील  आर्यांग्ल मेडिकल्स  परिवाराच्या वतीने 1981 साली बांधण्यात आलेल्या या अनोख्या श्री राम मंदिरात चे उद्घाटन तत्कालीन श्री कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वर्गीय श्रीमत चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांच्या हस्ते झाले. त्यानंतर यापदावर असलेल्या स्वर्गीय परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती स्वामी महाराज आणि विद्यमान पिठाधीश परमपूज्य विजयेन्द्र शंकराचार्य सरस्वती स्वामी महाराजांनीही या मंदिरास वारंवार सातारा भेटी प्रसंगी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे.

 सध्या सुरू असलेल्या गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यानच्या चैत्रशुद्ध प्रतिपदाचे चैत्र शुद्ध नवमी दरम्यानच्या या श्रीराम नवरात्र काळात पाटील परिवाराच्या वतीने या मंदिरात विविध धार्मिक उपक्रम राबविले जात आहेत .त्यामध्ये सायंकाळी सात वाजता म्हणण्यात येणारी प्रभू श्री रामचंद्राचे विविध अंगी वर्णन असणारी श्री रामरक्षा, रामभक्त हनुमान चे भीमरूपी स्तोत्र तसेच विविध आरत्या आणि मंत्रपुष्पांनी हा परिसर दुमदुमून जात आहे. परिसरातील शेकडो रामभक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहून या अनोख्या सायंकाळी प्रार्थना व आरत्यांचा लाभ घेत आहेत.

यावेळी या मंदिर प्रांगणात असलेल्या वेदमूर्ती दत्ताशास्त्री जोशी यांच्या शिष्यांकडून विविध स्तोत्रे तसेच एक सुरात म्हटली जाणारी प्रार्थना व इतर पदे यामुळे एक वेगळेच वातावरण निर्माण होताना दिसून येते. या पाठशाळेतील ब्रह्मचाऱ्यांकडूनच या मंदिरातील रामरायाची पूजा, आरती केली जाते आणि त्यानंतर या स्तोत्रपठणाला एक सुरात अतिशय शिस्तबद्धपणे प्रारंभ होतो. आरत्या म्हणून झाल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्वांना हातात प्रसाद ही वितरण केला जातो. आता येत्या गुरुवारी दिनांक 26 मार्च रोजी रामनवमीला दुपारी12वाजता प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मकाळ तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पाटील परिवाराच्या वतीने प्रसाद पाटील यांनी दिली. असे हे शांत रमणीय व सुंदर असे निसर्गरम्य परिसर लाभलेले पाटील यांच्या राम ध्यानमंदिरास सातारकरांनी या काळात एकदा तरी अनुभवावे व रामरायाचे दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे असेच म्हणावेसे वाटते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
पुढील बातमी
८ दिवसांची मुदत; कोरेगाव–तडवळे मार्गाचे काम सुरू न झाल्यास आझाद चौकात रास्ता रोको - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

संबंधित बातम्या