सातारा : सातारा येथील आयेशा ताहेर मणेर ही नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या सी.ए. फायनल परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे.
आयेशा हिचे शालेय शिक्षण मोना स्कूल, सातारा येथे झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे झाले. शालेय शिक्षणापासूनच तिला शिष्यवृत्ती मिळाली होती. तिला सीए आनंद कासट यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच आर्टिकलशिप मध्ये सीए संजय मेहता व सीए मेहुल मेहता यांचे मार्गदर्शन लाभले.
आयेशा ही सातारा येथील प्रसिद्ध फौजदारी वकील एडव्होकेट ताहेर मणेर यांची कन्या आहे. आयेशा हिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.