सातारा : सातारा तालुक्यातील दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या फिर्यादी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या पूर्वी अशोक नामदेव कदम रा. मालगाव, ता. सातारा यांनी राहत्या घरी आजारपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, प्रणव प्रकाश जाधव रा. सोनगाव तर्फ सातारा, ता. सातारा या युवकाने सोनगाव येथील काळे तुकडे नावाच्या शिवारात असलेल्या पोल्ट्री फार्म मधील लोखंडी अँगल ला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार के. आर. निकम करीत आहेत.