सातारा : नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास बसप्पा पेठ, सातारा येथील यशवंत हॉस्पिटलच्या अलीकडे रस्त्याच्या मधोमध जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने एअरटेल कंपनीची इंटरनेट वायफायची वायर आडवी लोंबकळत ठेवल्याने शिवानी आनंदराव कदम रा. करंजे नाका, सातारा यांच्या गळ्याला लागून त्या गाडीवरून पडल्याने जायबंदी झाल्या. या प्रकरणी एअरटेल कंपनीच्या इंटरनेट वाय-फाय वायरच्या मालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 01 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
घरासमोर गाडी पार्क केल्याच्या रागातून वनवासवाडी येथे गाडीची तोडफोड
December 27, 2025
खासगी सावकारीप्रकरणी साताऱ्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल
December 27, 2025
जुनी एमआयडीसी येथे साडेतीन लाखाच्या फसवणूक प्रकरणी महिलेवर गुन्हा
December 27, 2025