गौराईच्या नैवेद्यासाठी दुधापासून झटपट बनवा चविष्ट दूधपुआ

by Team Satara Today | published on : 30 August 2025


राज्यासह संपूर्ण देशभरात सणावाराच्या दिवसांमध्ये अनेक वेगवेगळे पारंपारिक पदार्थ बनवले जातात. गणपती बाप्पाचे सगळीकडे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. गणपती आल्यानंतर तीन दिवसांनी घरात गौराईचे आगमन होते. गौरी पूजन करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. कोकणात जेष्ठ गौरीचे आगमन झाल्यानंतर अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यात अतिशय आवडीने बनवला जाणारा पदार्थ दुधपुआ. याआधी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवलेला मालपुआ खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला दुधपुआ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पदार्थासाठी जास्त साहित्य आणि वेळ सुद्धा लागत नाही. कमीत कमी वेळात झटपट पदार्थ तयार होतो. चला तर जाणून घेऊया दुधपुआ बनवण्याची रेसिपी. 

साहित्य:

दूध

साखर

तांदळाचे पीठ

वेलची पावडर

सुका मेवा

पाणी

कृती:

दुधपुआ बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात थोडे थोडे पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करून घ्या.

कढईमध्ये दूध उकळवण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार साखर, सुका मेवा आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.

दूध घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून दूध थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

पॅन गरम करून त्यात तूप टाका आणि तांदळाचे पीठ गोलाकार पसरवून दुधपुआ बनवून घ्या.

दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर काढा. ताटात तांदळाचा तयार केलेला दुधपुआ घेऊन त्यावर तयार केलेले दूध ओतून खाण्यासाठी सर्व्ह करा.

तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला दुधपुआ. हा पदार्थ राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आवडीने बनवून खाल्ला जातो.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दहशतवाद्यांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ ह्यूमन GPS चकमकीत ठार
पुढील बातमी
जबरी चोरी प्रकरणातील कुख्यात आरोपीचा एन्काऊंटर

संबंधित बातम्या