सातारा : दरवर्षी सातारा रनर्स फौंडेशनच्या माध्यमातून देशभरात लोकप्रिय अशा जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन चे आयोजन केले जाते. यावर्षीची मॅरेथॉन ही Powered by Malas असून, या मॅरेथॉनचे हे 14 वे वर्ष असून, या वर्षी ही मॅरेथॉन रविवार, दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी होणार असून, या अनुषंगाने या वर्षीच्या टी शर्ट व जिंगल ट्यूनच्या अनावरणाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम रविवारच्या Long Run च्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात प्रथम राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते कुंडीतील रोपांना पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेस डायरेक्टर डॉ अविनाश शिंदे यांनी केले. त्यांनी या वर्षी Fancode या OTT प्लॅटफॉर्मवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे आपली स्पर्धा ही जगभरात पोहोचण्यास मदत होणार आहे. या मॅरेथॉनची मिडिया पार्टनर म्हणून झी 24 तास ही वृत्तवाहिनी असणार आहे. तर फोटोग्राफी पार्टनर म्हणून One Glint हे असणार आहेत. त्याचबरोबर दरवर्षी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉंझ अशी तीन प्रकारची मेडल्स आपण देत असतो, त्यासाठी गन टायमिंग हे प्रमाण धरले जात होते, परंतु, यावर्षी मेडल्ससाठी चीप टायमिंग हे प्रमाण धरले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप काटे यांनी Back to Route या वर्षीच्या थीमबद्दल उपस्थितांना अवगत केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच जेबीजी ग्रुपचे डायरेक्टर गौरव जजोदिया हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मालाज ग्रुपचे डायरेक्टर हुसैन माला यांची विशेष उपस्थिती होती. तसेच निशांत माहेश्वरी, श्रद्धा माहेश्वरी यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला होती.
या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार्या प्रत्येकाला दरवर्षी उत्तम रंगसंगती असणारे, आकर्षक आणि उत्कृष्ट दर्जाचे टी शर्टस देण्यात येतात आणि असे आकर्षक टी शर्ट परिधान करून धावणे हे सर्व स्पर्धकांसाठी खूप अभिमानाचे आणि आनंदाचे असते, असे प्रतिपादन टी शर्ट डिझाईनर अदिती कुलकर्णी यांनी केले.
या प्रसंगी पुण्याचे नामवंत जाहिरात निर्माते श्री अमेय जोगळेकर यांनी खास आपल्या जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनसाठी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या ऑफिशियल जिंगलचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमात Philanthropy Partner म्हणून इंडिया केअर फौंडेशन यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सांबरवाडी, यवतेश्वर, गोळीमारनगर, कृष्णानगर, विक्रांतनगर, कण्हेर - जांभळेवाडी या शाळांना तर सदरबझार येथील नगरपालिकेची तक्षशीला शाळा व बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळा अशा एकूण 8 शाळांना खेळाचे साहित्य भेट म्हणून देण्यात आले. तसेच तीन शाळेतील लहान मुलांसाठी व्यायामशाळा (Monkey Bars) बसवण्यात आली. या सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना या वेळी पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या गौरवण्यात आले. यावेळी इंडिया केअर फौंडेशनच्या सौ. मीना यांचा सत्कार सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने सौ. केतकी पंडित यांनी केला.
यावेळी बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा रनर्स फौंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. मी स्वतः सुद्धा या मॅरेथॉनमध्ये धावणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन ही फक्त एक स्पर्धा नाही, तर फिटनेस व समाजसेवेचा संदेश देणारा उत्सव आहे असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सातारा जिल्ह्याची ओळख ही आतापर्यंत स्वराज्याची राजधानी म्हणून होती, आता मॅरेथॉनची राजधानी म्हणून देखील सातारची एक नवी ओळख निर्माण झाली आहे. त्याबद्दल त्यांनी संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे आणि सर्व टीमचे मनापासून कौतुक केले. ही मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी जी काही मदत लागेल, त्यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या पाठीशी निश्चितपणे असेल हा विश्वास मी आपल्याला देतो, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.
या र्डीपवरू ङेपस र्ठीप मध्ये सुमारे 500 हून अधिक धावपटूंनी सहभाग घेऊन केंद्र शासनाच्या ड्रग फ्री इंडिया या मोहिमेला पाठींबा देत नशामुक्त भारताचा संदेश दिला.
याप्रसंगी सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, रेस डायरेक्टर डॉ अविनाश शिंदे, उपाध्यक्ष विशाल ढाणे, सेक्रेटरी शैलेश ढवळीकर, खजिनदार राहुल घायताडे, तसेच संस्थापक सदस्य डॉ प्रतापराव गोळे, ड कमलेश पिसाळ, डॉ चंद्रशेखर घोरपडे, सीए विठ्ठल जाधव, जितेंद्र भोसले, डॉ सुचित्रा काटे, जॉईंट रेस डायरेक्टर डॉ दिपक बनकर, डॉ देवदत्त देव, अभिषेक भंडारी, डॉ पल्लवी पिसाळ, भाग्यश्री ढाणे, डॉ दीपक थोरात, डॉ मनिषा थोरात, डॉ अदिती घोरपडे, डॉ रंजिता गोळे, डॉ अश्विनी देव, डॉ विकास पाटील, गिरीश साठे, लीना साठे, भाविका मुथा, दिनेश उधाणी, शिल्पा जाधव, डॉ. कैलास खडतरे, मिलिंद हळबे, केतकी पंडित, नितीन किरवे, पंकज नागोरी, प्रफुल्ल पंडित, सारंग गुजर, निशाद पंडित, निरंजन पिसे, डॉ सुधीर पवार, जयंत शिवदे, सागर निंबाळकर, माधुरी शिवदे त्याचबरोबर सातारा शहर व परिसरातील अनेक धावपटू, हितचिंतक, तसेच आपल्या स्पर्धेला वेळोवेळी सहाय्य करणारे स्वयंसेवक तसेच प्रायोजकही यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी ब्डनशिया हे ब्रॅण्डिंग पार्टनर असलेली संपूर्ण टीम या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती.
संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीएस नेहा दोशी यांनी केले.