सातारा : बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळा सातारा चा इयत्ता सातवी मधील विद्यार्थी आदित्य गोपीचंद स्वामी याने डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक 28 फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेमध्ये 13 वर्षांखालील गटात वैयक्तिक रौप्य पदक व सांघिक सुवर्णपदक प्राप्त केले.
या कामगिरी च्या जोरावर त्याची निवड दि. 20 ते 22 मार्च 2025 रोजी गुंटूर आंध्र प्रदेश येथे होणार्या राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेसाठी झाली आहे.आदित्य हा अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आदिती स्वामीचा लहान भाऊ आहे. त्याला दृष्टी आर्चरी अकॅडमी सातारा चे मानद प्रशिक्षक प्रवीण सावंत व सहाय्यक प्रशिक्षक शिरीष ननावरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल दृष्टी आर्चरी अकॅडमीचे अध्यक्ष राजेश देशमुख उपाध्यक्ष महेंद्र कदम सचिव सायली सावंत पालक प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी तसेच बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेचे मुख्याध्यापक मस्के सर, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.