सातारा : अवैधरित्या दारु विक्री केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका महिलेवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात महिलेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. संशयित महिलेकडून पोलिसांनी 840 रुपये किंमतीच्या 24 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.