अल्झायमर नि उपाय : डॉ. प्रमोद ढेरे निसर्ग उपचार तज्ञ

by Team Satara Today | published on : 01 October 2025


वयाच्या पन्नाशी नंतर सर्वात जास्त काळजी घ्यावी असा स्मरणशक्ती जाणारा आजार म्हणजे अल्झायमर. कारण मला माझा सांभाळ करता येणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांना पण खूप असुविधा होईल. मात्र, अल्झाइमर न होण्यासाठी जिभेचा एक प्रभावी व्यायाम आहे, तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे-

1) शरीराचे वजन संतुलित ठेवणे.

2) रक्तदाब संतुलित ठेवणे.

3) मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे.

4) दमा कमी करणे.

5)  जवळची दृष्टी चांगली करणे.

6) कान गुंजने कमी करणे.

7)  घसा कमी खराब होणे.

8) खांदा, मान यांचा संसर्ग कमी होणे.

9) झोप चांगली लागणे.

व्यायाम अगदी सोपा आणि शिकण्यास सुलभ असा आहे. दररोज सकाळी खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करावा. जीभ बाहेर काढा आणि १० वेळा डावीकडे उजवीकडे हलवा. मी दररोज हा व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यापासून, माझ्या आठवण शक्ती मधे सुधारणा झाली. माझे डोके हलके आणि ताजेतवाने वाटायला लागले आणि इतर सुधारणाही आहेत.

1) जवळचे नीट दिसायला लागले.

2) शरीर संतुलन राहायला लागले.

3) तब्येत व्यवस्थित राहणे.

4)  चांगले पचन होणे.

5)  सर्दी खोकला कमी होणे.

6)  मी अधिक सामर्थ्यवान आणि चपळ झालो.

टिप : जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते. वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की, जिभेचा BIG ब्रेनशी संबंध आहे. जेव्हा आपण म्हातारे आणि अशक्त होतो, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की, आपली जीभ ताठर होते आणि बर्‍याचदा आपण जीभ चावतो. जिभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल, आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट
पुढील बातमी
इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी

संबंधित बातम्या