सातारा : सातारा शहरातील राधिका रोडलगत असणाऱ्या गार्डन सिटी जवळ मोकळ्या मैदानाच्या जागेत लाला सुरेश घाडगे व संदीप राजू पवार (दोघे रा. आकाशवाणी झोपडपट्टी) हे पोलिसांना संशयीतरित्या अंधाराचा फायदा घेऊन स्वतःचे अस्तित्व लपवण्यासाठी चेहरा झाकून अपराध करण्याच्या उद्देशाने पोलिसांना आढळून आले .पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्यामुळे दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने दोघे फिरत असल्याची खात्री पोलिसांना पटली, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सागर दिलीप गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार माने आणि यादव करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
सातारा शहरातील राधिका रोडलगत अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 25 December 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा