अपघातात दोनजणांना जखमी केल्याप्रकरणी स्पोर्ट बाईकर वर गुन्हा

by Team Satara Today | published on : 21 April 2025


सातारा : अपघातात दोनजणांना जखमी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात स्पोर्ट बाईकर वर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोघे मित्र दुचाकीवरुन घरी जात असताना स्पोर्ट बाईकवरुन आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात दोघेजण जखमी झाले. हा प्रकार दि. 6 रोजी लिंब खिंड ते वाढेफाटा या सेवा रस्त्यावर गुरुकृपा गॅरेजसमोर घडला. यात दुचाकीस्वार (एमएच 11 सीए 2865) वेदांत उमेश कुलकर्णी, निषाद नितीनकुमार शिखरे हे जखमी झाले. या प्रकरणी नंदा नितीनकुमार शिखरे (वय 40, रा. रांगोळी कॉलनी, शाहूपुरी, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असुन, स्पोर्टबाईक (क्र. एमएच 12 एक्सजी 2449) चालक स्वप्निल राजकुमार चोपणे (रा. चंद्रपूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलीस नाईक बोराटे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या