अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 18 May 2025


सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अन्सार सिकंदर वाघवाले (वय 21, रा. परळी ता.सातारा) व रोहित आनंदराव गायकवाड (वय 26, रा.परळी ता.सातारा) अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोन्ही कारवाई परळी येथे केल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आयशर टेम्पोच्या धडकेत महिला जखमी
पुढील बातमी
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या