सातारा : सातारा शहरालगतच्या बिलासपूर येथील साई कॉलनी मध्ये रात्री उशिरा बिबट्याने भरवस्तीत येऊन कुत्र्याचे पिल्लू पळवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना कॅमेराबद्ध झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. म्हणून वनविभागाने येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. सातारा शहरालगतच्या डोंगर भागामध्ये हिंस्त्र प्राणी वाढत्या शहरीकरणामुळे थेट मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. आठ दिवसापूर्वी माची पेठेमध्ये तीन तरस थेट मानवी वस्तीत आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. यावेळी तरसाएवजी बिबट्याने थेट साई कॉलनी येथून भर रस्त्यावरून कुत्र्याचे पिल्लू पळवल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. विलासपूर येथून उंटाचा डोंगर हा वनविभागाचा परिसर नजीक असल्यामुळे येथे बिबट्याचा सर्रास वावर आढळतो. वनविभागाच्या हद्दीलगत सातारा शहराच्या हद्दीतील कोल्ह्यांचे क्षेत्र वाढल्यामुळे बिबट्यांचा कॉरिडॉर प्रभावित झाला आहे. साई कॉलनीच्या एका बंगल्यामध्ये सीसीटीव्ही असल्याने हा थरारक प्रकार चित्रित झाला आहे. या कॅमेर्यामध्ये एक युवती घराबाहेर फिरत असताना कुत्र्याची दोन पिल्ले रस्त्यावर होती. त्यावेळी बिबट्याने अचानक तेथे येऊन पिल्लांवर हल्ला केला आणि त्यातील एक पिल्लू पळवले. त्यामुळे साई कॉलनीमध्ये रात्री शतपावलीसाठी फिरणाऱ्या नागरिकांचीही अडचण झाली आहे. सातारा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांना या घटनेची कल्पना देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी वन विभागाचे पथक या भागाला भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे.
विलासपूर येथे बिबट्याने पळवले कुत्र्याचे पिल्लू
नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
by Team Satara Today | published on : 24 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
ड्राय डे नावाला, पार्सल मिळतंय भावाला
December 02, 2025
सातारा जिल्हा न्यायालयासमोर रुग्णवाहिका आणि एसटी बसची समोरासमोर धडक
December 01, 2025
जिल्ह्यात हुडहुडी.....; सातारा गारठला, रविवारी रात्रीपासून थंडीचा जोर
December 01, 2025
हाच खरा मर्दांचा खेळ, निवडणुका तर तृतीयपंथीही लढवतात
December 01, 2025
राजापुरी येथे ६० हजार रुपये किंमतीच्या केबलची चोरी
November 30, 2025
नेले-किडगावमध्ये जुन्या भांडणावरून एकाला मारहाण
November 30, 2025
सातार्यातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे पोलिसांना सापडली कारमध्ये तलवार
November 30, 2025
सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील दत्तनगर कॅनॉलजवळ कारची फळ स्टॉलला धडक
November 30, 2025