सातारा : चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मलाबार येथे दि. 19 रोजी श्री ट्रव्हर्ल्सचे चालक सलिम शिकलगार यांच्या ट्रव्हल्समधील प्रवाशी यांची निळ्या रंगाची बॅगची चोरी करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी महम्मद हमिद मुल्ला (वय 32, रा. म्हसवे) याने फिर्याद दिली असून, संदीप आनंद मेळाट (रा. दिव्यनगरी, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार माने तपास करत आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
