सातारा : येथील बसस्थानक येथे बॉम्ब स्फोट झाला आहे, अशी माहिती देणारा कॉल करुन सार्वजनिक ठिकाणी भितीचे, दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याने दारुच्या नशेत हा प्रकार केला होता. पोलीस हवालदार शंकर रामदास चव्हाण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे असून, आकाश राजेंद्र भोसले (वय 30, रा. आयटीआय रोड, मोळाचा ओढा, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.