08:23pm | Dec 11, 2024 |
सातारा : शिवसागर जलाशय व धोम धरण जलाशयामध्ये जमिन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी उतरणारी व उड्डाण घेणारी सी प्लेनची सुविधा निर्माण करावी, अशी सूचना वजा मागणी आज खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाला वाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी केंदीय राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांच्या हवाई वाहतुक मंत्रालयाला दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, सातारा जिल्हा हा विविधतेने नटलेला जिल्हा आहे. प्रचंड पर्जन्यमान आणि दुष्काळी भाग अश्या विरोधीभासी वातावरणातील सातारा जिल्हयातील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण हे तालुके दुर्गम आणि डोंगराळ म्हणून ओळखले जातात. जागतिक पातळीवर प्रसिध्द असलेली महाबळेश्वर आणि पांचगणी ही दोन थंड हवेची ठिकाणी लाखो भारतीय आणि परदेशी नागरीक पर्यटकांना साद घालत असतात. सातारा लोकसभा मतदार संघातील या वैशिट्यामुळे येथे विकासात्मक पर्यटन रोजगाराची प्रचंड संधी आहे. महाराष्ट्र शासनाने जावली तालुक्यातील मुनावळे या गावात जलक्रीडा पर्यटन विकास साध्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कार्यवाही सुरु केली आहे. तसेच शिवसागर जलाशयामध्ये जागतिक स्तरावरील जलपर्यटनाची योजना देखिल मंजूर केली असून, त्याचीही कार्यवाही लवकरच सुरु होत आहे.
या जलपर्यटन विकासाच्या जोडीला सुमारे 900 चौरस किलोमिटर अश्या विस्तीर्ण शिवसागर जलाशयात आणि सुमारे 20 चौरस किलोमिटरच्या धोम जलाशयातुन उड्डाण किंवा पाण्यावर उतरणारी सी प्लेन उपक्रम सुरु करणेबाबत हवाई वाहतुक मंत्रालयाने योजना राबवावी. ऍम्फीबायस प्लेन्सचा उपक्रम राबविल्यास, याठिकाणी आपोआप नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. केंद्राने नुकतेच मेघालय आणि आसाम राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ऍम्फीबायस प्लेन ची कार्यवाही सुरु केली आहे. त्यामळे तेथील भागाच्या विकासाला निर्णयात्मक प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्याभागाचा अमुलाग्र बदल होणार आहे. त्याच धर्तीवर कोयना शिवसागर आणि धोम जलाशयामध्ये जमिन आणि पाणी असा उभयचर उडडाण करणारी आणि उतरणा-या ( टेक ऑफ व लॅन्डींग ) सी प्लेनची सुविधा सुरु केल्यास विकासाच्या दृष्टीने चालना मिळणार आहे, असेही उदयनराजे भोसले यांनी निवेदनात नमुद केले आहे.
यावेळी ना.मुरलीधर अण्णांनी तातडीने कार्यवाही करतो असे आश्वासन देताना, महाराज साहेबांची सूचना आम्हाला काम करण्यास उत्साह निर्माण करते. याबाबत मी स्वतः लक्ष घालतो असेही आवर्जुन नमुद केले. याप्रसंगी काका धुमाळ, ऍङ विनित पाटील, करण यादव इ. उपस्थित होते.अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |