शाहूपुरी हद्दीत गणेश कॉलनी येथे महिलेचे मंगळसूत्र लांबवले.

by Team Satara Today | published on : 27 January 2026


सातारा : शाहूपुरी हद्दीत गणेश कॉलनी येथे दोन अनोळखी चोरट्यानी दुचाकीवरून पाठीमागून येत रोहिणी बाळकृष्ण कुंभार (वय ६५ रा. सर्वानंदनगर, पेठकर कॉलनी, रविवार पेठ, वाई,जि. सातारा) यांच्या गळ्यातील २२ हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या पट्टीमध्ये काळे मणी असलेले मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले आहे. यावेळी महिलेने मंगळसूत्र हाताने पकडल्याने त्याचा अर्धा भाग चोरट्यांचा हाताला लागला नाही. तुटलेला अर्धा भाग दुचाकीवरील चोरट्यानी घेऊन पळ काढला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दि.  २६ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक साबळे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा मध्यवर्ती बस स्थानकात चोरीचे सोने बाळगल्याप्रकरणी परप्रांतीय महिलांवर गुन्हा दाखल.
पुढील बातमी
जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली; साताऱ्यातून शुभारंभ; उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर जोरदार टीका

संबंधित बातम्या