सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या हाती या प्रकरणातील सीडीआर लागला आहे. त्यानंतर डॉक्टर महिलेच्या मृतदेह चा शवाविच्छेदन अहवाल समोर आला असून तिचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
साताऱ्याच्या फलटण उप रुग्णालयातील महिला डॉक्टरने गत गुरुवारी रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती तत्पूर्वी त्यांनी आपल्या हाताला हातावर सुसाईड नोट लिहून आपल्या मृत्यूसाठी पीएसआय गोपाळ बदने व घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर हे दोघे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचे त्यांनी नमूद केले. या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी या दोघांच्या मुस्क्या आवडल्या या पार्श्वभूमीवर त्यांच्या पोस्टमार्टम चा रिपोर्ट समोर आला आहे.
काय आहे अहवालात ?
मृत डॉक्टरच्या मृतदेहावर त्या कार्यरत असणाऱ्या सातारा जिल्हा रुग्णालयातच शवविच्छेदन झाले त्यानंतर रुग्णालयाने शवविच्छेदनाचा अहवाल सातारा पोलिसांना सादर केला त्यात महिला डॉक्टरच्या मृत्यूचे खरे कारण नमूद करण्यात आले आहे या अहवालानुसार महिला डॉक्टरचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाला त्यांच्या अंगावर कुठेही आघात केल्याचे किंवा जखम असल्याचे आढळून आले नाही.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत या प्रकरणातील सर्व घटनाक्रम प्रसारमाध्यमांना स्पष्ट केला होता. फोटो काढण्यावरून झालेला वाद त्यावरून आत्महत्या करण्याचा आलेला मेसेज, हा सर्व तपशील यापूर्वी समोर आला आहे. सीडीआरच्या माध्यमातून सुद्धा सातारा पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. न्याय वैद्यक प्रयोगशाळेचाही अहवाल समोर येईल पण प्राथमिक अहवालात हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.